17.6 C
New York

Paris Olympics : मराठीचा डंका वाजवणाऱ्या स्वप्निलला मुख्यमंत्र्यांकडून मोठं बक्षीस

Published:

मुंबई

पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) सहाव्या दिवशी भारतानं आणखी एका पदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या सुपुत्रानं कांस्यपदकावर (Bronze Medal) आपलं नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये नेमबाज स्वप्नील कुसाळेनं (Swapnil Kusale) कांस्यपदकाची कमाई केली. यानंतर स्वप्नीलच्या या चमकदार कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही (CM Eknath Shinde) स्वप्नील कुसाळे आणि त्याच्या कुटुंबियांचं अभिनंदन केलं आहे. तसंच ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसाळेला मुख्यमंत्र्यांकडून 1 कोटीचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियाना फोन करत त्यांचं अभिनंदन केलं.

ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव कोरणारा स्वप्नील कुसाळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीमधील कांबळवाडी गावचा आहे. त्याच्या या मूळगावी देखील जल्लोष केला जातोय. नेमबाज स्वप्नील कुसाळे याने केलेल्या कामगिरीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलंय. स्वप्नील हा आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांना दिलं. पॅरीस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नीलच्या कुटुंबियांचं मुख्यमंत्र्यांनी फोनवरून अभिनंदन केलं आहे.

कुसाळे कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळेच स्वप्नील या यशापर्यंत पोहचू शकला आहे. त्याच्या गेल्या 12 वर्षांच्या मेहनतीमुळे देशाला आणि राज्याला क्रीडा क्षेत्रातील महत्वपूर्ण असे यश मिळालं आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, स्वप्नीलला शालेय जीवनापासून ते नेमबाजीत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या गुरुजन, प्रशिक्षक, मार्गदर्शक अशा सर्वांचे योगदान निश्चितच महत्वाचं आहे. तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img