20.4 C
New York

 Janhvi Kapoor : मोरोक्कोतील कुत्र्यांच्या हत्येच्या योजनेवर जान्हवी कपूरचा संताप म्हणाली, ‘ही गुन्हेगारी आहे!

Published:

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही तिच्या कुत्र्यांवर असलेल्या प्रेमासाठी नेहमीच चर्चेत असते. ती खरी श्वानप्रेमी असून तिच्या घरात वेगवेगळ्या जातींचे अनेक कुत्रे आहेत. आपल्या पाळीव प्राण्यांवर ती जीवापाड प्रेम करते.

मात्र नुकतंच जेव्हा तिला मोरोक्कोमध्ये (Morocco) 30 लाखांहून अधिक भटक्या कुत्र्यांना मारण्याची योजना आखण्यात आल्याची धक्कादायक माहिती समजली, तेव्हा तिचा संताप अनावर झाला. मोरोक्को 2030 सालच्या फुटबॉल वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी तयारी करत आहे, आणि रस्ते ‘स्वच्छ’ ठेवण्यासाठी लाखो भटक्या कुत्र्यांना मारण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

या अमानुष कृतीविरोधात मोरोक्कोतील प्राणी कल्याण संघटनांनी आवाज उठवला असून, आता जान्हवी कपूरने देखील सोशल मीडियावरून याला जोरदार विरोध केला आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या बातमीचा एक स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं, “हे खरंच असू शकत नाही. भटक्या प्राण्यांचे पुनर्वसन करण्याचे इतके पर्याय असताना, त्यांना ठार मारून स्वच्छता साध्य करायची? हे सरळसरळ गुन्हेगारी आहे!” जान्हवीच्या या पोस्टमुळे प्राणिप्रेमी आणि तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर तिच्या समर्थनार्थ बोलू लागले आहेत.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर जान्हवी लवकरच ‘परम सुंदरी’ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार आहे. हा चित्रपट 29 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img