नाश्ता म्हणजे दिवसाची खरी सुरूवात. रात्रीच्या उपवासानंतर शरीराला ऊर्जा देणारा आणि दिवसभर सतेज ठेवणारा पहिला आहार म्हणजे नाश्ता. त्यामुळे नाश्ता हा केवळ भरपेटच नव्हे, तर पोषणमूल्यांनी समृद्ध असणे फार गरजेचे आहे. विशेषतः महिलांसाठी रोज सकाळी “आज नाश्त्याला काय करायचं?” हा यक्षप्रश्न असतोच. घरच्यांना रोज नवीन, पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ मिळावेत, अशी प्रत्येक गृहिणीची इच्छा असते. अशा महिलांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत ५ असे नाश्त्याचे पर्याय जे चवीलाही उत्तम आहेत आणि आरोग्यासाठीही.
- ओट्स विथ फ्रूट्स आणि सुपरसीड्स
जर तुम्हाला काही हलकं आणि हेल्दी खायचं असेल, तर ओट्सचा नाश्ता उत्तम पर्याय आहे. यासाठी ओट्स 5-7 मिनिटे दूधात उकळा आणि ते थंड झाल्यावर त्यात तुमच्या आवडती फळं (जसं की सफरचंद, केळी, बेरीज), चिया बिया, अळशी बिया आणि बदाम, अक्रोड, काजू यासारखे ड्रायफ्रूट्स मिसळा. थोडंसं मध टाकून तुम्ही याची चव वाढवू शकता. हा नाश्ता फक्त चविष्ट नाही, तर फायबर, प्रथिने, अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ ने भरलेला असतो. कामावर जायच्या आधी झटपट तयार होणारा आणि पचनसंस्थेस मदत करणारा पर्याय म्हणून तो उत्तम आहे.
- ग्रीक योगर्ट पार्फे
उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा देणारा, पण प्रथिनांनी भरलेला पर्याय हवा असेल, तर ग्रीक दह्याचे पार्फे नक्की ट्राय करा. एका पारदर्शक ग्लासमध्ये प्रथम ग्रीक दही घाला, त्यावर थरथरित ग्रॅनोला, नंतर चिरलेली फळं – जसं की स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, सफरचंद, कीवी – आणि वरून थोडंसं मध आणि चिया बिया शिंपडा. हे ५ मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा आणि मग सर्व्ह करा. भरपूर प्रथिनं, हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे हा नाश्ता त्वचा, केस आणि हृदयासाठीही फायदेशीर आहे.
- व्हेजी ऑम्लेट + होल ग्रेन टोस्ट
अंडी हा सर्वात सहज उपलब्ध प्रथिनांचा स्त्रोत आहे. तुम्ही ऑम्लेट करताना त्यात कांदा, टोमॅटो, सिमला मिर्च, पालक अशा भाज्या घालून ते अधिक पोषक करू शकता. थोडं मीठ, मिरपूड आणि हळद टाकून ऑम्लेट बनवा आणि होल ग्रेन टोस्टसोबत सर्व्ह करा. या कॉम्बिनेशनमध्ये प्रथिने, फायबर, आणि हेल्दी फॅट्स मिळतात. सकाळी कामावर जाणाऱ्यांसाठी हा नाश्ता झटपट तयार होणारा आणि अधिक वेळ पोट भरून ठेवणारा आहे.
- बेसन पॅनकेक
पॅनकेक म्हटलं की लगेच मैदा आणि साखर आठवते, पण याला हेल्दी ट्विस्ट देण्यासाठी तुम्ही बेसन वापरू शकता. बेसनात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, हळद, जिरे आणि मीठ टाका. हे मिश्रण पसरवून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. हे पॅनकेक्स प्रथिनं आणि फायबरने भरलेले असून वजन कमी करत असलेल्या लोकांसाठी योग्य आहेत. सोबत ताजं लोणचं किंवा दही दिलं तर त्याची चव अधिक खुलते.
- अॅव्होकॅडो टोस्ट
मल्टीग्रेन ब्रेडवर मॅश केलेलं अॅव्होकॅडो लावा – त्यात थोडंसं लिंबाचा रस, मीठ आणि चिली फ्लेक्स मिसळा. हा नाश्ता फक्त ५ मिनिटांत तयार होतो आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असतो. अॅव्होकॅडो हृदयासाठी फायदेशीर आहे आणि वजन नियंत्रणासाठी देखील उपयोगी पडतो. वरून टमाटर स्लाइस किंवा उकडलेलं अंडं ठेवून त्याची पोषणमूल्ये दुप्पट करू शकता.