16.4 C
New York

Operation Sindoor : भारतीय सेनेचा पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांवर निर्णायक प्रहार, सेलिब्रिटींकडून जल्लोष

Published:

22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला होता. याचे प्रत्युत्तर देताना भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) येथील अतिरेक्यांचे नऊ ठिकाणांवरील तळ उद्ध्वस्त करत ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. हा हवाई हल्ला अत्यंत नियोजनबद्ध आणि अचूक असल्याचे सूत्रांकडून कळते.

भारतीय सेनेच्या या शौर्यकृतीवर देशभरातून जल्लोष होत असून, बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रातील नामवंत कलाकारांनी याचे स्वागत करत सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेता अनुपम खेर (Anupam kher) आणि रितेश देशमुख यांनी “भारत माता की जय”च्या घोषणांद्वारे आपली देशभक्ती व्यक्त केली. साथ निभाना साथिया फेम देवोलिना भट्टाचार्जीने (Devoleena Bhattachrje) ट्वीट करत म्हटलं की, “धर्म विचारून गोळी मारली, आता त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. जय हिंद!” दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी लिहिलं, “आमच्या प्रार्थना आमच्या सैन्यासोबत आहेत. एक राष्ट्र, एक संकल्प.” अभिनेत्री निमरत कौरनेही (Nimrat kaur) “एक देश, एक मिशन” म्हणत सैन्याला पाठिंबा दिला.

गायक राहुल वैद्यने (Rahul Vdaiya) म्हटले, “देव आपल्या सैनिकांचे रक्षण करो. जय हिंद.” कंगना राणौत (Kangana ranaut), हिना खान (Hina khan), विक्रांत मेस्सी (Vikrant messi), चिरंजीवी, ज्युनियर एनटीआर (Jr. NTR), अल्लू अर्जुन (Allu arjun)आणि अक्षय कुमार (Akshay kumar)यांसारख्या बड्या कलाकारांनीही आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करत सैन्याच्या या कारवाईचं समर्थन केलं.

या हल्ल्यामुळे केवळ शत्रूंना ठोस उत्तर मिळालं नाही तर देशवासीयांमध्ये पुन्हा एकदा लष्कराविषयी अभिमान निर्माण झाला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ लष्करी कारवाई नव्हे, तर प्रत्येक भारतीयाच्या मनातील संतापाला दिलेलं उत्तर आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img