16.8 C
New York

Seema Haider : पाकिस्तानचा हात की काळी जादू? वकीलांचा खळबळजनक दावा

Published:

पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर (Seema Haider) पुन्हा एकदा चर्चेत आहे. ग्रेटर नोएडातील तिच्या घरी 3 एप्रिल 2025 रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. एका युवकाने सीमाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि तिने त्याच्यावर काळी जादू केल्याचा दावा केला. हा कट अश्या लोकांनी रचला आहे ज्यांना सीमा आणि सचिन आवडत नाही या घटनेवर सीमाचे वकील (Adv. ) ए.पी. सिंह यांनी असा मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, हा हल्ला केवळ वैयक्तिक नाही, तर त्यामागे पाकिस्तानशी संबंध असू शकतो. वकील ए.पी. सिंह यांनी सीमाला “कट्टर सनातनी” संबोधत तिच्या हिंदू धर्म स्वीकारण्यावर भर दिला आणि हल्ल्यामागे धार्मिक वैमनस्य असल्याचा संशय व्यक्त केला.

सीमा 2023 मध्ये नेपाळमार्गे भारतात आली आणि सचिन याच्याशी लग्न केले. तिने हिंदू धर्म स्वीकारला आणि आता ती स्वतःला सनातनी म्हणवते. मात्र, हल्ल्याचा आरोपीवर काळ्या जादूचे आरोप करत पोलिसांना सांगितले की, सीमाने त्याच्यावर जादू केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याची मानसिक स्थिती तपासली जात आहे. ज्या पद्धतीने तरुणाने काळ्याजादूबद्दल सांगितले, पोलिसांसाठी गोंधळून टाकणार होता. सीमाच्या वकिलांनी असा दावा केला आहे की, हल्ल्यामागे पाकिस्तानी कट असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा विषय गंभीर बनला आहे. सीमा हैदर सर्व संतानी सण साजरे करत असते. त्यामुळे या कोणत्याही गोष्टींचा तिच्यावर परिणाम होणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले, त्यामुळे सीमाच्या भवितव्याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img