23.9 C
New York

ICC Rankings : आयसीसी रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा

Published:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी खेळाडू्ंची लेटेस्ट रँकिंग (ICC Rankings) जारी केली आहे. यामध्ये टीम इंडियाचा स्टार लेग स्पिनर वरुण चक्रवर्तीने धडाकेबाज कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्याचे (Champions Trophy 2025) प्रदर्शन शानदार राहीले. याचा परिणाम त्याच्या आयसीसी रँकिंगवर झाला आहे. गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये वरुणने 143 अंकांची झेप घेत थेट टॉप 100 मध्ये एन्ट्री घेतली आहे. वरुण 97 व्या (Varun Chakravarthy) क्रमांकावर पोहोचला आहे.

वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफीत दोन सामने खेळले आहेत. यात त्याने सात विकेट्स घेतल्या आहेत. यातील पाच विकेट्स तर एकाच सामन्यात घेतल्या आहेत. न्यूझीलंड (IND vs NZ) विरूद्धच्या सामन्यात वरुणने पाच खेळाडूंना बाद केले. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात (India vs Australia) 2 विकेट्स घेतल्या.

ICC Rankings विराट चमकला, रोहितची घसरण

दुसरीकडे टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराटही त्याच्या (Virat Kohli) जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांत विराटने धावांचा पाऊस पाडला. पाकिस्तान विरूद्धच्या (Pakistan Cricket) सामन्यात विराटने शतक ठोकले. आयसीसीच्या फलंदाजांच्या यादीत शुभमन गिल टॉपवर आहे. विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा झाला आहे. यामुळे विराट या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या व्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्माची मात्र (Rohit Sharma) घसरण झाली आहे. रोहित आधी तिसऱ्या क्रमांकावर होतो तो आता पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

विराट कोहली सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्पर्धेतील चार सामन्यांत 72.33 च्या सरासरीने विराटने 217 धावा केल्या आहेत. साखळी फेरीत पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात झंझावाती खेळी करत विराटने शतक झळकावले होते. या शतकाचा फायदा त्याला आयसीसी रँकिंगमध्ये झाला आहे.

ICC Rankingsv अक्षर पटेलनेही घेतली झेप

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल चांगली कामगिरी करत आहे. कर्णधार रोहित शर्माची कामगिरी मात्र खालावली आहे. रोहितने चार सामन्यांत फक्त 26 च्या सरासरीने 104 धावा केल्या आहेत. या टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत 41 धावा हा रोहितचा बेस्ट स्कोअर राहिला आहे. यामुळे रोहितला फटका बसला आहे. टॉप 10 फलंदाजांच्या यादीत शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मासह श्रेयस अय्यरही आहे. श्रेयस आता आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अक्षर पटेलने मोठी झेप घेतली आहे. अक्षर आता या यादीत 13 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. टॉप 10 अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जडेजा एकमेव भारतीय खेळाडू आहे. या यादीत जडेजा नवव्या क्रमांकावर आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img