13.2 C
New York

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल

Published:

अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुजबळ यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. छगन भुजबळ आज (26) पुण्यात होते. मात्र, त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुण्याहून विशेष विमानाने मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी ते पुणे दौऱ्यावर होते. ताप आणि घशाच्या संसर्गामुळे त्यांना दुपारी पुण्यातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. याआधी देखील त्यांना अशा तब्येतीच्या कारणानिमित्त हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img