17.6 C
New York

Team India: भारतीय संघासाठी असणार इंग्लंड दौरा महत्वपूर्ण

Published:

निर्भयसिंह राणे

टीम इंडिया (Team India) 2025-2027 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वात इंग्लंड दौऱ्यावर जाईल. यावेळी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले असून, पहिला कसोटी सामना 20 जूनला लीड्स येथे आणि शेवटचा सामना 31 जुलैला त्याच मैदानावर खेळला जाईल. इतर कसोटी सामने बर्मिंघम, लॉर्ड्स आणि मॅन्चेस्टर येथे होणार आहेत आणि या मालिकेचा परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वावर प्रभाव टाकेल.

भारताने इंग्लंडमध्ये गेल्या 17 वर्षांत कसोटी मालिका जिंकलेली नाही, त्यामुळे हा दौरा भारतीय संघासाठी मोठी परीक्षा ठरणार आहे. 2007 साली भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. 2021-22 च्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता, परंतु मालिका 2-2 ने बरोबरीत संपुष्टात आला. कोविडमुळे एक सामना होण्यास उशीर झाला आणि इंग्लंडने शेवटच्या सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत केली. इंग्लंडच्या भूमीवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन्ही फायनलमध्ये भारताला पराभवाचा सामाना करावा लागला.

त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) च्या नेतृत्वाखाली हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याव्यतिरिक्त, टीम इंडिया महिला संघ सुद्धा इंग्लंडमध्ये पाच टी20 आणि तीन वनडे सामनेही खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचे आगामी वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक:

  • पहिला कसोटी सामना: 20-24 जून, हेडिंग्ले
  • दुसरा कसोटी सामना: 2-6 जुलै, बर्मिंघम
  • तिसरा कसोटी सामना: 10-14 जुलै, लॉर्ड्स
  • चौथा कसोटी सामना: 23-27 जुलै, मॅनचेस्टर
  • पाचवा कसोटी सामना: 31 जुलै-4 ऑगस्ट, लंडन

महिला संघाच्या टी20 मालिकेचे वेळापत्रक:

  • पहिला T20 सामना: 28 जून, नॉटिंघम
  • दुसरा T20 सामना: 1 जुलै, ब्रिस्टॉल
  • तिसरा T20 सामना: 4 जुलै, लंडन
  • चौथा T20 सामना: 9 जुलै, मॅन्चेस्टर
  • पाचवा T20 सामना: 12 जुलै, बर्मिंघम

वनडे मालिकेचे वेळापत्रक:

  • पहिला वनडे सामना: 16 जुलै, साउथँप्टन
  • दुसरा वनडे सामना: 19 जुलै, लॉर्ड्स
  • तिसरा वनडे सामना: 22 जुलै, चेस्ट ली स्ट्रीट

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img