19.2 C
New York

Apple : आयफोन 16 प्रो मॉडेल आता भारतात बनणार

Published:

निर्भयसिंह राणे

आयफोन 16 प्रो सिरिज ही सेप्टेंबरमध्ये असणाऱ्या ॲपल (Apple) इवेंटमध्ये नवीन आयफोन सिरिजचा एक भाग असतील. एका वृत्तानुसार, प्रो सिरिज भारतासाठी महत्वाची असेल कारण ॲपल त्यांचे फ्लॅगशिप आयफोन पहिल्यांदाच भारतात असेंबल करण्याच्या विचारात आहे. ॲपलने आपल्या करखान्यांमध्ये कामगारांना नवीन पद्धतीचे प्रशिक्षण सुद्धा सुरू केले आहे ज्याला ते न्यू प्रॉडक्शन इंट्रोडक्शन (NPI) असं म्हणतात. या नवीन प्रशिक्षणामुळे प्रो सिरिजी आयफोन भारतात असेंबल होईल याची एक हिंट ॲपलने दिली आहे.

Apple iPhone: चीनमधील मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतात ॲपलने ने आयफोनच्या किमतीत केली कपात

ॲपलने काही वर्षांपासून आपले आयफोन प्रॉडक्शनसाठीचे कारखाने चीनच्या बाहेर सुरू केले आहेत. ॲपलने भारतात प्रॉडक्शन 2017 मध्ये आयफोन SE पासून सुरुवात केली, त्यानंतर आयफोन 13 आणि आयफोन 14 सुद्धा भारतात बनवले गेले. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आयफोन 16 प्रो सिरिज जर भारतात बनली तर ती भारतीय स्मार्टफोन मार्केट साठी एक मोठा फायदा असेल. ॲपलची प्रो मॉडेलचं प्रॉडक्शन भारतात करायची ही पहिलीच वेळ असेल – जी सध्या चीनमध्ये फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि विसट्रॉन सारख्या तैवानच्या भागीदारांसह बनवले जाते.

अहवालात असे नोंद करण्यात आले आहे की फॉक्सकॉन हे प्रो सिरिजसाठीचे प्राथमिक असेंबलर असतील आणि जागतिक लॉंचच्या आधीच तामिळनाडूच्या श्रीपेरामबुदूर प्लांटमध्ये असेम्ब्ली सुरू होईल आणि त्यासाठीच तिथल्या कामगारांना त्याचे प्रशिक्षण सुद्धा सुरू केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img