11 C
New York

Badlapur : ते शब्द माझे नाहीत, तिचा जन्म बदलापुरात झाला असेल तर…

Published:

बदलापुरात (Badlapur) शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अल्पवयीन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. अत्याचार प्रकरणाचे वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराबाबत शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते आणि बदलापूरचे माजी महापौर वामन म्हात्रे यांनी असभ्य भाषेचा वापर करत असंवेदनशील वक्तव्य केले. वामन म्हात्रे यांच्या वक्तव्यामुळे विरोधकही म्हात्रे यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. तसेच महिला पत्रकार मोहिनी जाधव यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना वामन म्हात्रे यांच्याशी झालेल्या संभाषणाची माहिती दिली.

काय म्हणाले म्हात्रे ?

‘तू अशा बातम्या देते जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’, असे वादग्रस्त वक्तव्य वामन म्हात्रे यांनी केले. आणि वामन म्हात्रे यांनी वापरलेल्या भाषेच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यासाठी सदर पत्रकार गेल्या असता पोलिसांनी वामन म्हात्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली नाही. या सगळ्यावर वामन म्हात्रे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्रकार मोहिनी जाधव ठाकरे गटासाठी काम करतात. ती स्टंट करत प्रसिद्धी मिळवत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला. ते शब्द माझे नाहीत. खरच तिचा जन्म बदलापुरात झाला असेल तर तिने आईवडिलांची शपथ घ्यावी. मी वाईट बोललो असतो तर तिचे पाय धरून माफी मागितली असती. असे वामन म्हात्रे म्हणाले.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

पत्रकार मोहिनी जाधव या बदलापुरात घडलेल्या शाळेत जात होत्या. त्याच रस्त्याने त्यांची भेट वामन म्हात्रे यांच्याशी झाली. बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, मोहिनी जाधव यांना पाहून थांबले आणि पत्रकारांनी हे प्रकरण पेटवून दिल्याचे सांगू लागले. यावेळी त्यांनी मोहिनी जाधव यांना तुम्ही बातम्या देत आहात, तुमच्यावर बलात्कार झाला आहे, अशी भाषा वापरली. यानंतर मोहिनी यांनी थेट पोलीस ठाणे गाठले, मात्र पोलिसांनी याप्रकरणी तक्रारही नोंदवली नाही, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, वामन म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही या महिला पत्रकाराला पाठिंबा दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img