17.6 C
New York

Watch Video : राज्यात नेमकं चाललंय काय ? पहिल्यांदा कारनं उडवलं नंतर समोरुन धडक दिली

Published:

सध्या परिस्थितीमध्ये बघायला गेल्यास महाराष्ट्रामध्ये सध्या अपघात आणि गुन्हे याच्या व्यतिरिक्त काही घडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून बदलापूर आंदोलनाने धगधगत असताना अंबरनाथ – बदलापूरमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

जुन्या कौटुंबिक वादातून कारने चार जणांना उडवल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यामध्ये कोणाचा मृत्यू झाला नसला तर अपघाताची दृश्य पाहून काळजाचा ठोका नक्कीच चुकतोय. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथ बदलापूर रोडवरील कार अपघातात सहभागी असलेले दोन्ही कार चालक चुलत भाऊ असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे कुटुंब मुंबईचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोघे जखमी झाले असून जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Watch Video:

ही घटना अंबरनाथमधील जांभूळ फाट्याजवळ मुख्य रस्त्यावर घडली. टाटा सफारी एसयूव्ही चालकाने पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनरचा पाठलाग केला. फॉर्च्युनर गाडी रस्त्याच्या कडेला उभी असताना मागून आलेल्या एसयूव्हीने जोरात धडक दिली. फॉर्च्युनरची धडक बसल्याने एक व्यक्ती कारसोबत खेचून घेऊन गेला. दरम्यान, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img