19.2 C
New York

Otur: ओतूरला श्री कपर्दिकेश्वराच्या दर्शनासाठी दीड लाख भाविक

Published:

Otur: जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर तिसरा श्रावणी सोमवार यात्रे निमित्त सोमवारी दि.१९ रोजी पहाटे सहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सुमारे दीड लाख भाविकांनी श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलींगावर तयार करण्यात आलेल्या कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडीचे व जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
सोमवारी पहाटेपासूनच मंदिरासमोर महिला व पुरूषांनी दर्शनासाठी स्वतंत्र रांगा लावल्या होत्या.
तिसरा श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर तांदळाच्या तीन कलात्मक पिंडी तयार करण्यात आल्या होत्या.पहाटे सहा वाजता रमेश शिवाजी डुंबरे,रामचंद्र ढोबळे, संजय तोत्रे, जालिंदर गाढवे,बबन भोर,रंजना घोलप यांच्या हस्ते सपत्नीक महाअभिषेक,आरती करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

दुपारी तीन वाजता मंदिराजवळील कुस्ती स्टेडियम मध्ये कुस्त्यांचा आखाडा भरला होता. मात्र त्याच वेळी मुसळधार पावसाने देखील हजेरी लावली होती. या कुस्त्या खेळण्यासाठी विविध जिल्ह्यातून मल्ल आले होते. कुस्त्या जमविण्याचे काम अविनाश ताजणे,विकास डुंबरे,प्रकाश डुंबरे,नामदेव काळे यांनी केले तर कुस्त्या सोडविण्याचे काम धनंजय डुंबरे,छबुराव थोरात,जालिंदर ढमाले,विकास डुंबरे यांनी केले.

लाडकी बहीण योजनेत बदल, आता ‘या’ महिलांना मिळणार 4500 रुपये


बबन डुंबरे,गांधी पानसरे,ज्ञानेश्वर खामकर,भाऊसाहेब खाडे यांनी समालोचन केले.आखाड्यास आदिवासी नेते माजी जि.प.सदस्य देवराम लांडे,देवराम मुंढे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेतील भाविकांना आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत होते. नारायणगाव एसटी आगाराच्या वतीने यात्रेकरूंसाठी जादा एसटी गाड्यांची सोय करण्यात आली होती.यात्रेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थिटे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img