26.5 C
New York

Eknath Shinde Convoy Accident : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

Published:

जळगाव

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) कडवं आव्हान परतवून लावण्यासाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) सपाटून मार खाललेल्या महायुतीने (MahaYuti) आता विधानसभेसाठी नो रिस्क भूमिका घेत जंग जंग पछाडले आहेत. महायुतीने आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत जळगावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Convoy Accident) मेळाव्यासाठी जळगाव विमानतळावर पोहचल्यानंतर तिथून मेळाव्याच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यातील चार वाहने एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जळगाव विमानतळावरून मेळाव्याच्या ठिकाणी जात असताना विमानतळ परिसरातच हा अपघात झाला आहे.

जळगावात महायुतीच्यावतीने भव्य मेळावा आज आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही जळगाव विमानतळावर दाखल झाले होते.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img