15.6 C
New York

Paris Olympics 2024 : “हा कुस्तीपटू ठरला भारतातील सर्वात तरुण वैयक्तिक पदक विजेता”

Published:

निर्भयसिंह राणे

भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने (Aman Sehrawat) पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) मध्ये पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवून पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. सेहरावतने भारताचे पाचवे कांस्यपदक जिंकले आणि एकूण भारताचे सहावे पदक आहे. 21 वर्षीय सेहरावत जपानच्या रे हिगूचीकडून पराभूत झाल्यानंतर भारतासाठी किमान रौप्य्पदक मिळवण्याची संधी हुकली.

Team India : टीम इंडियाच्या ‘या’ नवख्या खेळाडूचा दमदार कारनामा

अमनला डॅरियन क्रूझने कडवे आव्हान दिले परंतु त्यावर मात करत यश मिळवले आणि सामन्याच्या शेवटच्या सेकंदापर्यंत सामन्यावर वर्चस्व राखले. यासह, अमन सेहरावतने आपल्या कारकिर्दीतील पहिले ऑलिम्पिक पदक मिळवले आणि सुशील कुमार (2008 आणि 2012), योगेश्वर दत्त (2012), साक्षी मलिक (2016), रवी दहिया (2021), बजरंग पुनिया (2021) आणि त्यांनंतरचा सहावा ऑलिम्पिक पदक जिंकणारा भारतीय कुस्तीपटू बनला.

याव्यतिरिक्त, अमन सेहरावत वयाच्या 21 व्या वर्षी भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे. 2016 मध्ये रिओ ओलीम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकून त्याने पीव्ही सिंधूचा 21 वर्षे, 1 महिना आणि 14 दिवसांचा विक्रम मोडीत काढला. 2024 मध्ये, अमनने ओलीम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे त्याचं स्वप्न साकार केले जेव्हा त्याने इस्तानबुलमधील जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पॅरिससाठी स्थान मिळवले. पात्रता फेरीत सहभागी होण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाने टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता रवी दहियावर अमनची निवड केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img