24.6 C
New York

IND vs SL: भारताने 27 वर्षांनंतर गमावली वनडे मालिका

Published:

निर्भयसिंह राणे

बुधवारच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात (IND vs SL) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीमचा 110 धावांनी लाजिरवाणा पराभव झाल्याने माहिती नसलेल्या भारतीय बॅटिंग युनिटची स्पिनविरुद्धची धडपड या सामन्यात दिसून आली, ज्याच नेतृत्व पाच विकेट्स असलेल्या दुनिथ वेललालगेने केले. पहिला सामाना बरोबरीत संपल्यानंतर श्रीलंकेने तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली आणि 1997 नंतर श्रीलंकेचा भारतावरील हा पहिला द्विपक्षीय वनडे मालिका विजय आहे.

डावखुरा फिरकीपटू वेललालगे, ज्याने आत्तापर्यन्त भारताला त्याच्या फलंदाजीने दुखापत केली, त्याने 5 विकेट्स घेऊन भारताला चकवा दिला. सलामीवीर अविष्का फेरनंदो 96 धावा करत लंकेला 7 बाद 248 धवांपर्यंत नेले. तथापि भारताची सुरुवात चांगली झाली होती, शुभमन गिल लवकर बाद होऊन सुद्धा, कर्णधार रोहित शर्माने 20 चेंडूत 35 धावा करत भारताला एक उत्तम सुरुवात दिली.

Paris Olympics : कुस्तीपटू अंतीम पंघालही अडचणीत; शिस्तभंगाचा आरोप

इनिंग्सच्या चौथ्या षटकात रोहितने 6,4,4,4 आशा क्रमाने एक धडाकेबाज प्रदर्शन केले. पॅन रोहितच्या पसंतीच्या फटक्यांपैकी स्वीपनेच भारतीय कर्णधाराची विकेट घेतली. वेललालगेच्या चेंडूवर रोहित 35 धावा बनवून बाद झाला. रोहित माघारी परतल्यावर बाकीचे भारतीय फलंदाज गोंधलच्या भोवऱ्यात बुडाले. विराट कोहली (20) टर्नसाठी खेळला आणि त्याला वेललालगेने LBW केलं.

भीषण कार अपघातातून पुनरागमन केल्यानंतर आपला पहिला वनडे खेळणारा ऋषभ पंतला सुद्धा रॅंक टर्नर पिच समोर झुकावे लागले आणि थीकशाणाच्या चेंडूवर स्टंपड झाला. अर्शदीप सिंगच्या जागी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रियान पराग हा लेगस्पीनर जेफ्री वांडेरसेला शरण गेला आणि विकेट गमावली. कुसल परेरा आणि कमिंदू मेंडिस यांनी सातव्या विककेटसाठी 36 धावा जोडून समाना भारताच्या हाताबाहेर नेला आणि जिंकला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img