15.6 C
New York

Rohit Sharma: भारतीय कर्णधाराची सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग असलेल्या एलिट लिस्टमध्ये समावेश

Published:

निर्भयसिंह राणे

सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15,000 धाव करणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मेन इन ब्लुसाठी एकमेव तिसरा फलंदाज ठारला. शुक्रवारी, 2 ऑगस्ट रोजी कोलंबोमधील आर.प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितने ऐतिहासिक कामगिरी केली. या विक्रमासह, रोहितने ५० ओव्हर्स फॉरमॅटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणारा महान सचिन तेंडुलकर (15,335) आणि वीरेंद्र सेहवाग (16,119) यांच्याबरोबर सामील झाला आहे. एकूण 15,000 धावा करणारा तो 10 वा सलामीवीर ठरला आहे.

IND vs SL ODI :भारत-श्रीलंका एकदिवसीय सामना टाय, अंतिम षटकात नाट्यमय संघर्ष

श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनाथ जयसूर्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक 19,298 धावा केल्या आहेत. पहिल्या पाचच्या यादीत, वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल (18,867), ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (18,744), दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ (16,950) आणि दुसरा विंडीज फलंदाज डेस्मंड हेन्स (16,120) यांचाही समावेश आहे. टॉप 10 च्या यादीत सेहवाग आणि तेंडुलकर सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत.

“सार्वकालीन महान वनडे सलामीवीरांपैकी एक”- भारताचे माजी क्रिकेटपटू क्रिस श्रीकांत म्हणाले


भारताचे माजी क्रिकेटपटू क्रिस श्रीकांत (K Srikanth) यांनी रोहित शर्माच्या ओपनिंगमध्ये येऊन मोठा स्कोर केल्याबद्दल त्याचे कौतुक केले. त्यांनी रोहितला आतापर्यंतच्या महान सलामीवीरांपैकी एक मानले आहे असे क्रिस श्रीकांतने 2022 मध्ये स्टार स्पोर्ट्सला सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img