11.5 C
New York

Marble Market : नवी मुंबईतील मार्बल व्यवसायकांविरोधात टेम्पो चालकांचे आंदोलन

Published:

नवी मुंबई

नवी मुंबईतील (Navi Mumbai) पनवेल नजीक असलेल्या कळंबोली मार्बल मार्केट (Marble Market) मधून स्थानिक भूमिपुत्र टेम्पो चालकांना हद्दपार करण्यात येत असल्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने आज बेमुदत वाहतूक काम बंद आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मार्बल मार्केट मधील संपूर्ण व्यवसाय ठप्प पडला होता. माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष बाळासाहेब बोरकर (Balasaheb Borkar) यांच्या नेतृत्वात आज काम बंद आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने आज मार्बल मार्केट रोडपाली येथील टेम्पो चालक मालक यांच्यावर होत असलेल्या अन्याय विरुध्द न्याय मिळेपर्यंत मार्केट बंद करण्याचे आदेश युनियनच्या वतीने देण्यात आली होता. त्यानुसार युनियनच्या वतीने आज मार्बल मार्केटमध्ये मार्बल व्यवसायिकांची हुकूमशाही विरोधात आंदोलन केले. संपूर्ण मार्केटमध्ये पदयात्रेद्वारे व्यवसायिकांच्या हुकूमशाहीला विरोध दर्शवत घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात टेम्पो चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.

मार्बल व्यवसायिकांकडून येथील स्थानिक टेम्पो चालकांना काम देण्यात येत नाही. तसेच परप्रांतीयातून आलेल्या इतर व्यक्तींना कमी पैशांमध्ये काम देण्यात येत असल्याने येथील स्थानिक टेम्पो चालकांचे मोठे नुकसान होत आहे. मार्बल व्यवसायिकांनी स्थानिक टेम्पो चालताना प्राधान्य दिले नाही तर या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे ऑल महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक बाळासाहेब बोरकर यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img