10.6 C
New York

Bigg Boss OTT 3: बिग बॉस ओटीटी ३ मधून पायल मलिकची एक्सिट! नेटकरी भडकले

Published:

Bigg Boss OTT 3:’बिग बॉस ओटीटी’चा तिसऱ्या (Bigg Boss OTT 3) सीझनची चर्चा जोरदार सुरु आहे. हा सिझन सुरु झाल्यापासून चांगलाच गाजतोय. रविवारी ३१ जूनला या सिझनमधून पायक मलिक (Payal Malik) शोमधून बाहेर झाली. प्रेक्षकांकडून आणि पायलच्या चाहत्यांकडून कमी मतं मिळाल्याने पायलला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागलं. पायलचा पती अरमान मलिक आणि तिची सवत कृतिका मलिक या दोघांसोबत बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. ‘जनतेचा निर्णय जाहीर झाला आहे. पायल मलिकला घराबाहेर जावं लागेल’, अशी पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. हा जाहीर केलेला निर्णय अतिशय चुकीचा आहे असं म्हंटल जातंय. ‘हे योग्य नाही बिलकुल. नेझी, मुनिषा, दीपक,आणि सना सुलतान बिग बॉसच्या घरात का आहेत ? हा निर्णय पूर्ण चुकीचा आहे’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Bigg Boss OTT 3: एकाने लिहिलं, ‘पायलला बिग बॉसच्या घराबाहेर जाणं एकदम चुकीचं आहे. हा पक्षपात आहे,’ तर दुसऱ्याने लिहिलंय, हे घर चांगल्या लोकांसाठी नाहीच आहे असं नेहमीच वाटतं. आणि हे पुन्हा एकदा या शोमधून सिद्ध झालंय’, काही जणांनी पायलला बिग बॉसची विजेती तूच असल्याचं म्हंटलय. बिग बॉस ओटीटीचे होस्ट अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी नॉमिनेशननंतर जनतेचा निर्णय सर्वाना ऐकवला. “जनतेने बाहेरच्या दोन स्पर्धकांना वाचवलं आहे. आणि हे दोन स्पर्धक म्हणजे अरमान मलिक आणि दीपक चौरासिया आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये ‘बाहरवाला’ साई केतन राव होता आणि त्याने सना सुलतानाला एलिमिनेशनपासून वाचवलं होत. आता घरातला नवीन ‘बाहरवाला’ लवकेश कटारिया बनला आहे,”

‘देवापुढे नतमस्तक होते’, क्रांती रेडकरची ‘ती’ पोस्ट भावुक

रविवारी पायलसोबत शिवानी कुमार आणि लवकेश कटारिया हे दोघेही नॉमिनेट झाले होते. ज्यावेळी अनिल कपूरने इतर स्पर्धकांना विचारलं की घराबाहेर कोण जाऊ शकतं, तेव्हा सर्वानी आत्मविश्वासाने सांगितलं होत की त्यांचे चाहते व प्रेक्षक त्यांना एलिमिनेशनपासून वाचवतील. मात्र सई आणि रणवीर शौरी यांनी पायलच्या एलिमिनेशनची शक्यता वर्तवली होती.

यानंतर अनिल कपूरने जेव्हा अरमान मलिकला पायलच्या एलिमिनेशनविषयी विचारलं, तेव्हा तो म्हंटला,”मी तर तयार आहे, जर ती एलिमिनेट झाली, तर ती घरी जाऊन आमच्या चार मुलांचा सांभाळ करू शकेल. आणि जर ती बिग बॉसच्या घरात राहिली तर तिने एलिमिनेट होण्यासारखं काही केलेलं नसू शकतं.” यावर अनिल कपूर त्याला म्हणाले,” “चित भी मेरी और पट भी मेरी”. याचा अर्थ दोन्ही बाजूने आपलाच विजयच होणार असल्याचं आरमानने म्हटलंय.

‘बिग बॉस ओटीटी 3’मधून पहिला विकेंडचा वार पार पडेपर्यंत २ स्पर्धक घरातून बेघर झाले आहेत. बॉक्सर नीरज गोयत याआधी बेघर झाला होता. त्यानंतर अरमानची पहिली बायको पायल मलिकला बिग बॉसचं घर सोडावं लागलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img