9 C
New York

Maratha Reservation : मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित, सरकारला तूर्तास दिलासा

Published:

जालना

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज पुन्हा उपोषण 13 जुलै पर्यंत स्थगित केले आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्याबाबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ आंतरावली सराटीमध्ये दाखल झालं. राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज मनोज जरांगे यांचे आंदोलन स्थळे भेट घेतली. त्यावेळी सगेसोयरीची अंमलबजावणी 30 जून पूर्वी करा असे अल्टीमेटम देत जरांगे यांनी आंदोलन 13 जुलै पर्यंत स्थगित केले आहे.

दुपारी एक वाजता शंभूराजे देसाई यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांच्या मागण्याबाबत आणि त्यांनी उपोषण मागे घ्यावं,विनंती शंभूराजे देसाई यांनी केली. देसाई यांनी दिलेला शब्दाला मानत देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. मराठा आणि कुणबी यांनी एकच आहे. तर सगेसोयऱ्यांची मागणी 30 जूनपर्यंत पूर्ण करा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. त्यावर सरकारची बाजू सांगताना देसाई यांनी सरकारला एका महिन्याचा वेळ द्यावा, अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली होती.

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सगेसोयरेच्या बाबत निर्णय घेण्यासाठी योग्य ते पाऊल सरकारकडून उचललं जाईल, असं आश्वासन दिलं. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी एक महिन्याचा अल्टीमेटम दिला. तर सरकारच्या शिष्टमंडळाने आम्ही तातडीने याबाबतच्या बैठका घेऊ आणि निर्णय घेऊ, असं आश्वासन दिलं. या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आलं तेव्हा दोन्ही बाजूने चर्चा करण्यात आली. मनोज जरांगे सगेसोयऱ्याच्या मुद्द्यावर कायम राहिले. यावेळी शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आपल्या सर्व मागण्या मान्य होतील. फक्त तुम्ही उपोषण मागे घ्या. तुमच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले. शंभूराज देसाई यांनी आपण उद्या याबाबतची तातडीचे बैठक घेऊ, असं आश्वासन मनोज जरांगे यांना दिलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img