२५ डिसेंबरला नाताळ का साजरा केला जातो ?

नाताळ हा ख्रिस्ती धर्मीयांचा सर्वात मोठा सण आहे जो दरवर्षी २५ डिसेंबर रोजी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो.

 नाताळाच्या दिवशी ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात आणि एकमेकांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देतात.  

नाताळाच्या सजावटीत ख्रिसमस ट्री, मेणबत्त्या आणि रंगीबेरंगी रोषणाईचा समावेश असतो. 

नाताळबाबा हा नाताळाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो लहान मुलांना भेटवस्तू देतो असे मानले जाते. 

बायबलनुसार येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथलेहेम येथे एका गोठ्यात झाला होता. 

देवदूतांनी मेंढपाळांना येशूच्या जन्माची घोषणा केली आणि तीन बुद्धिमान पुरुष येशूला भेटवस्तू देण्यासाठी आले. 

ख्रिस्ती धर्म अधिकृत धर्म होण्यापूर्वी, २५ डिसेंबर हा रोमन देवता सॅटर्नच्या सन्मानार्थ साजरा केला जायचा.  

नाताळबाबाची उत्पत्ती एक संत, सेंट निकोलस यांच्याशी निगडित आहे. सेंट निकोलस हा चौथ्या शतकात तुर्कस्तानमध्ये राहणारा एक धार्मिक व्यक्ती होता.  

तो गरीब आणि गरजू लोकांना गुप्तपणे मदत करण्यासाठी प्रसिद्ध होता.  

काळाच्या ओघात सेंट निकोलसच्या कथा लोकांमध्ये प्रचलित झाल्या आणि त्यांचे रूप बदलत गेले. डच लोकांनी त्याला सांता क्लॉज  म्हणून ओळखायला सुरुवात केली.  

१२ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? तर चला जाणून घेऊया...