'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात ओळखली जाणारी, तरुणांची क्रश असलेली प्राजक्ता माळी सध्या वेगळ्याच कारणाने गाजत होती.

मराठी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करुन पुढे आलेली प्राजक्ता माळी सध्या हायजत्रा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे. 

प्राजक्ता माळीचा लूक, बोलण्याची स्टाइल यामुळे ती तरुणांचा क्रश बनली आहे. 

प्राजक्ता माळीचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी झाला. 

मुंबईकर तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली प्राजक्ता मुळची पुणेकर आहे. तिचे शालेय शिक्षण पुण्यातूनच पूर्ण झाले. 

अभिनय, नृत्य, मॉडेलिंग, सूत्रसंचालन अशा सर्वच क्षेत्रात तिने आपला ठसा उमटविला आहे.

पुण्याच्या कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशाळा येथून तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. 

प्राजक्ताने वयाच्या ७ व्या वर्षापासून भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. 

पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून पदवी आणि मास्टर डिग्री पूर्ण केली. येथे देखील ती टॉपर होती.

प्राजक्ताने 'तांदळा- एक मुखवटा' या सिनेमातून आपल्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली. 

प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं असून 'फुलवंती' हा चित्रपट प्रदर्शित केला होता. 

मात्र ती सध्या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ती चर्चेत आली होती.

७ वर्षांपूर्वी उत्तराखंडची मुलगी इंडस्ट्रीत आली अन् ८०० कोटींचा सिनेमा करुन रातोरात स्टार झाली. चला तर पाहूया नक्की ही मुलगी आहे तरी कोण...