७ वर्षांपूर्वी उत्तराखंडची मुलगी इंडस्ट्रीत आली अन् ८०० कोटींचा सिनेमा करुन रातोरात स्टार झाली. चला तर पाहूया नक्की ही मुलगी आहे तरी कोण...
अनेक गावातील मुला मुलींचं टीव्ही किंवा बॉलिवूडमध्ये येऊन हिरो-हिरोईन होण्याचं स्वप्न असतं.
त्या स्वप्नाच्या दिशेने घरदार सोडून ते मायनगरीत येतात. कोणी यशस्वी होतं तर काहींना अपयशही येतं.
तिने सुरुवातीच्या सिनेमांमध्ये उत्तम काम केलं, मात्र खरी लोकप्रियता तिला ८०० कोटींच्या सिनेमातील 'त्या' सीनमुळेच मिळाली
अशीच एक अभिनेत्री जी पहाडी भागातून आली. सुरुवातीला मॉडेलिंग, जाहिराती, युट्यूब व्हिडिओ करत नशीब आजमावलं.
अचानक तिचे नशीब पालटले आणि थेट ८०० कोटी कमावणाऱ्या सिनेमातून ती नावारुपाला आली.
तृप्ती डिमरीचा १९९४ साली उत्तराखंडमधील गढवाल गावात जन्म झाला.
तिने सुरुवातीचं शिक्षण तिथेच घेतलं. यानंतर दिल्ली विश्वविद्यालयातून मानसशास्त्राचा अभ्यास केला.
मुंबईत येऊन ऑडिशन द्यायला सुरुवात केली आणि२०१७ साली 'पोस्टर बॉइज' सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
तृप्तीने आतापर्यंत अनेक सिनेमे केले आहेत. 'लैला मजनू', 'बुलबुल', 'भूलभुलैय्या ३', 'बॅड न्यूज', 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' या सिनेमांचा समावेश आहे.
आगामी 'धडक २', 'आशिकी ३', 'अॅनिमल पार्क' या सिनेमांमध्ये ती लवकरच दिसणार आहे.
तृप्ती वैयक्तिक आयुष्यात सुरुवातीला अनुष्का शर्माच्या भावाला डेट करत होती.
तर सध्या ती बिझनेसमन सॅम मर्चंट सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.
नुकतेच आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तर चला टाकूया एक नजर त्याच्या कारकिर्दीवर...