इंग्रजांच्या जवळपास १५० वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाने स्वातंत्र्य मिळवलं
१५ ऑगस्ट १९४७ रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर युनियन जॅक खाली उतरून तिरंगा फडकवण्यात आला.
त्यामुळे १५ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी एक खास दिवस.
यंदा आपण ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत.
पण ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देताना १५ ऑगस्ट हाच दिवस का निवडला? यामागच्या कारणाची मात्र अनेकांना माहिती नाही.
ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून भारत स्वातंत्र झाला तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन हे व्हाईसरॉय होते.
लॉर्ड माउंटबॅटन यांचा नशिबावर विश्वास होता.१५ ऑगस्ट ही तारीख आपल्यासाठी लकी आहे असा त्यांचा विश्वास होता.
कारण याच तारखेला म्हणजेच १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानी सैन्याने ब्रिटिशांसमोर आत्मसमर्पण केलं होतं.
त्यावेळी माऊंटबॅटन हे मित्र राष्ट्रांचे कमांडर होते.
त्यामुळे दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या नायकांमध्ये माऊंटबॅटन यांची गणना होते.
यामुळेच जेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्याची चर्चा झाली तेव्हा माउंटबॅटन यांनी १५ ऑगस्ट ही तारीख निवडली.
कमी कॅलरी आणि हेल्दी ड्रिंकच्या नादात अनेक लोक फिजी ड्रिंक किंवा डाएट कोकची निवड करतात.
Check Out