नवीन वर्षाचे जगभरात दणक्यात स्वागत करण्यात आले. पण अनेक ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाते.
चिलीमध्ये लोक नवीन वर्षाच्या सुरूवातीला स्मशानभूमीत झोपायला जातात. कारण असं केल्याने त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी त्यांची मान्यता आहे.
स्वित्झर्लॅंडमध्ये लोक भाग्य चांगलं रहावं आणि सुख-समृद्धी कायम रहावी म्हणून नव्या वर्षाला आइसक्रीम एकमेकांना शेअर करतात.
साऊथ अमेरिकेत लोक नव्या वर्षाला रंगीत अंडरविअर घालतात. असं करणं लोक चांगलं मानतात. खासकरून लोक लाल रंगाची अंडरविअर घालून नव्या वर्षाचं स्वागत करतात.
रोमानियामध्ये लोक नवीन वर्षाचं स्वागत अस्वलासारखा ड्रेस घालून डान्स करतात. यामागे अशी मान्यता आहे की, नव्या वर्षात वाईट आत्म्यांपासून सुटका मिळेल. रोमानियातील कथांमध्ये अस्वलांना फार महत्व आहे.
डेन्मार्कमध्ये लोक नव्या वर्षाचं स्वागत आपल्या मित्र आणि शेजाऱ्यांच्या दारात भांडी तोडून करतात. या देशात अशी मान्यता आहे की, नव्या वर्षाच्या सकाळी तुमच्या दारात जेवढी भांडी तुटतील तेवढं तुमचं भाग्य चांगलं होईल.
अर्मेनिया मध्ये एका कागदावर wishes लिहून त्या जाळल्या जातात. ती राख दुधात टाकून, ते दूध रात्री बारा वाजता good luck साठी पितात.
जपानमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता १०८ bells वाजवल्या जातात.या प्रथेला Joya-no-Kane असं म्हणतात.
ग्रीसमध्ये नवीन वर्षात भरभराट व्हावी म्हणून दरवाज्याबाहेर कांदे टांगले जातात.
क्युबामध्ये एकमेकांवर पाणी उडवून नवीन वर्षाची सुरुवात करतात. असे केल्याने bad luck निघून जाते असा समज आहे
२०२४ मध्ये लग्न बंधनात अटकलेल्या जोड्या नक्की आहेत कोणत्या ?