मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने आढळून येणारा पक्षी म्हणजे कबुतर .
या शहरांमध्ये सामान्यांनी कबुतरांचा प्रश्न वारंवार उपस्थित केला होता.
राज ठाकरेंच्या मनसेने दादरचा कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली होती.
पण कबुतरखाना बंद करण्यामागचे कारण नक्की आहे तरी कोणते ?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेत बुरशी आणि जीवाणू असतात. ज्यामुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.
कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस बुरशी आढळून येते. यामुळे अलर्जी होऊ शकते, अस्थमा देखील होण्याची शक्यता असते.
डॉक्टर सांगतात, 'अनेकांना याचा त्रास होत नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांना फुफ्फुसात संसर्ग होतो.'
कबुतरांच्या विष्ठेमुळे,त्वचेचे आजार, डोळे लाल होणं, सायनसायटिस यांसारखे आजार होण्याची शक्यता असते.
कबुरतांच्या विष्ठेमुळे कोणकोणते गंभीर आजार होण्याची शक्यता आहे
कबुतरांच्या विष्ठेमुळे हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया होण्याची शक्यता आहे.
अनेकांना श्वसननिलिकेला सूज येते.
फुफ्फुसांना सूज येण्याची शक्यता आहे.
क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणजेच श्वसनमार्गाचे गंभीर आजार होतात .
Check Out
तुम्ही वारंवार एटीएम वापरत असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.