नितीन देसाई यांचा जन्म दापोलीत ६ ऑगस्ट १९६५ रोजी झाला.

लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत ते निर्माता,  दिग्दर्शक आणि अभिनेतेही होते.

नितीन देसाई यांचं संपूर्ण नाव नितीन चंद्रकांत देसाई.

सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधी नितीन देसाई यांनी मुंबईतल्या सर.जे.जे कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले.

नितीन देसाई यांनी हम दिल दे चुके सनम,देवदास,लगान,जोधा अकबर या सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन केलं आहे

डिस्कव्हरी ऑफ इंडिया, तमस,चाणक्य, मृगनयनी यांसारख्या मालिकांचं कलादिग्दर्शनही त्यांनी केलं आहे

मराठी आणि हिंदी सिनेमांचं कलादिग्दर्शन करण्यासोबत त्यांनी सलाम बॉम्बे, बुद्धा,जंगल बुक,या हॉलिवूडपटांचं दिग्दर्शनही केलं आहे.

देसाई यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले. 

'लगान' आणि 'देवदास' चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देसाई यांना मिळाले.

तुम्ही वारंवार एटीएम वापरत असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.