भारतात राष्ट्रीय हातमाग दिवस दरवर्षी ७ ऑगस्टला साजरा केला जातो.
हा दिवस भारताच्या सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक हातमाग उद्योगाला समर्पित आहे.
७ ऑगस्ट १९०५ मध्ये याच दिवशी स्वदेशी चळवळीला सुरुवात झाली होती
परदेशी मालावर बहिष्कार घालणे हा त्याचा उद्देश होता.
ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकून भारतीय वस्तू आणि विशेषतः हातमाग उद्योगाला याच दिवशी प्रोत्साहन देण्यात आले होते.
शेतीनंतर हातमाग हे भारतातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे क्षेत्र आहे.
हातमाग कारागीर हे कापूस, रेशीम आणि लोकर पासून सुंदर साड्या आणि इतर वस्तू तयार करतात
या चळवळीमुळे भारतातील जवळपास प्रत्येक घरात खादी बनवायला सुरुवात झाली.
हा दिवस पहिल्यांदा ७ ऑगस्ट २०१५ रोजी साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
हातमाग दिनाचा उद्देश लघु उद्योगांना चालना देणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
हातमागाच्या उत्पादनांना भारतातच नाही तर परदेशातही मागणी आहे.
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
फॅशन शो, हस्तकला प्रदर्शने, परिसंवाद, कार्यशाळा याद्वारे लोकांना हातमागाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला जातो.
मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने आढळून येणारा पक्षी म्हणजे कबुतर .
Check Out