डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  स्मृतिदिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आयोजित केला जातो. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव आंबेडकर होते.

भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकरांनी आपल्या ६५ वर्षांच्या आयुष्यात सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, घटनात्मक अशा विविध क्षेत्रात अगणित कार्य करून राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

१९२४ मध्ये पीडित आणि शोषित असलेल्या वर्गाच्या कल्याणासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक संघटना सुरू केली.

१५ ऑगस्ट १९३६ रोजी त्यांनी पीडित- शोषित  वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ या पक्षाची स्थापना केली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमाने समता, बंधुता आणि मानवतेवर आधारित 'भारतीय संविधान' तयार केले. 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुधारणांमध्येही  बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोलाचे योगदान दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले.

३ डिसेंबर १९८४ रोजी झालेली भोपाळ दुर्घटना अजूनही आठवते का?तर चला एकदा त्या दिवसाची पुन्हा आठवण करूया...