मनिका विश्वकर्माने जयपूर येथे झालेल्या मिस युनिव्हर्स इंडिया 2025 स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे.
चला जाणून घेऊयात मनिका विश्वकर्मा कोण आहे?
'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' ही स्पर्धा नुकतीच पार पडली.
मनिका विश्वकर्माने 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५'चा खिताब नावावर केला
या स्पर्धेत देशातून ४८ स्पर्धक सहभागी झाल्या होत्या.
मनिका विश्वकर्माने बाजी मारत 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५'चा मुकुट मिळवला.
तर उत्तर प्रदेशची तान्या शर्मा पहिली उपविजेती, हरियाणाची महक ढींगरा दुसरी उपविजेती आणि अमीषी कौशिक तिसरी उपविजेती ठरली.
या ऐतिहासिक विजयामुळे आता ती थायलंडमध्ये होणाऱ्या 74व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
मिस युनिव्हर्स इंडिया जिंकण्याआधी तिनं ‘मिस युनिव्हर्स राजस्थान 2024’ चा किताबही पटकावला होता.
मिस युनिव्हर्स इंडिया जिंकण्याआधी तिनं ‘मिस युनिव्हर्स राजस्थान 2024’ चा किताबही पटकावला होता.
मनिकानं आपलं सुरुवातीचं शिक्षण गंगानगरमध्ये पूर्ण केलं आणि पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीत आली.
सध्या ती पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स या विषयात पदवी शिक्षण घेत आहे.
शिक्षणासोबतच तिनं मॉडलिंग आणि ब्यूटी पेजंट्समध्ये सातत्याने सहभाग घेतला. याचमुळे ती आज या उंचीवर पोहोचली आहे.
मनिकाची ही कहाणी केवळ एका ब्यूटी क्वीनची नाही, तर स्वप्न, मेहनत, आणि जिद्दीच्या जोरावर घडलेल्या यशाचं प्रतीक आहे.
छोट्या शहरातून येऊन, मोठ्या मंचावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या मनिकाकडून आता संपूर्ण देशाला आशा आहे की ती थायलंडमध्ये भारताचं तिरंगा अभिमानाने फडकवेल.
डासांबाबत या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात, का साजरा केला जातो जागतिक डास दिवस?
Check Out