पोर्तुगालचा फुटबॉल स्टार आणि अल नसर क्लबचा दिग्गज खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो याने आपली पार्टनर जॉर्जिना रॉड्रिगेजसोबत साखरपुडा केला आहे.
जॉर्जिनाने इन्स्टाग्रामवर हातातल्या अंगठीचा फोटो शेअर करत या क्षणाची माहिती चाहत्यांना दिली.
“हो, मी तुझ्यावर प्रेम करते…या जन्मात आणि येणाऱ्या प्रत्येक जन्मात,” असा भावनिक कॅप्शन तिने लिहिला.
रोनाल्डो आणि जॉर्जिनाची पहिली भेट २०१६ मध्ये एका गुची स्टोअरमध्ये झाली. त्या वेळी जॉर्जिना तिथे काम करत होती.
पहिल्याच भेटीत दोघांची ओळख वाढली आणि मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. २०१७ मध्ये दोघांनी आपल्या रिलेशनशिपची अधिकृत घोषणा केली.
आज रोनाल्डो- जॉर्जिना या जोडीला पाच मुले आहेत.
२०१० मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो ज्युनियरचा जन्म झाला.
२०१७ मध्ये जुळी मुले एवा मारिया आणि मातेआ या जगात आली.
२०२२ मध्ये बेला एस्मेराल्डा जन्माला आली. सध्या जॉर्जिना सर्व मुलांची काळजी घेत आहे.
अर्जेंटिनामध्ये २७ जानेवारी १९९४ रोजी जन्मलेली जॉर्जिना एक कुशल नर्तकी, मॉडेल आणि इन्फ्लुएंसर आहे.
९ वर्षांच्या नात्याचा हा नवा अध्याय फक्त फुटबॉल चाहत्यांसाठीच नव्हे तर जगभरातील त्याच्या चाहत्यांसाठी खास ठरला आहे
मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा ७ ऑगस्टला साखरपुडा पार पडला.
Check Out