३ डिसेंबर १९८४ रोजी झालेली भोपाळ दुर्घटना अजूनही आठवते का?तर चला एकदा त्या दिवसाची पुन्हा आठवण करूया...
भोपाळ गॅस दुर्घटनेच्या आठवणी आणि जखमा आज ४१ वर्षं नंतर सुद्धा तशाच ताज्या आहेत.
जगाच्या उद्योगातल्या इतिहासातली ही सर्वात मोठी आणि भयावह
दुर्घटना होती.
युनियन कार्बाईड फॅक्टरीतल्या टँक नंबर ६१० मधील गॅस गळती पहाटेच्या सुमारास सुरू झाली आणि हा
विषारी गॅस वाहत्या वाऱ्यासोबत शहरात पसरला.
फक्त ३ मिनिटांमध्ये या विषारी वायुने कारखान्याच्या जवळच राहणाऱ्या
कामगारांचा आणि गरीब
लोकांचा जीव घेतला.
सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेमध्ये १५००० लोक मारले गेले आणि पाच लाखांहून अधिक जखमी झाले.
पण बिगर-सरकारी स्रोतांनुसार ही संख्या यापेक्षा जवळपास तिप्पट होती. मृत्यूचं हे सत्रं पुढचं अनेक वर्षं सुरू होतं.
या दुर्घटनेनंतर भोपाळमध्ये
जन्मलेल्या अनेक बाळांमध्ये जन्मतःच
व्यंग आल्याचे दिसले.
भोपाळमध्ये जन्मलेल्या पुढच्या अनेक पिढ्यांवर या दुर्घटनेचे परिणाम पहायला मिळाले आहेत.
या दुर्घटनेत आजवर हजारोंचा बळी गेल्याचं म्हटलं जातं. युनियन कार्बाईडच्या फॅक्टरीतून त्या रात्री सुमारे ४० टन वायूची गळती झाली होती.
सुप्रीम कोर्टाच्या मध्यस्थीने भारत सरकारने युनियन कार्बाईडकरून ७१३ कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून घेतल्याचं स्वयंसेवी संस्थांचं म्हणणं आहे.
२६ नोव्हेंबर २००८ ला नेमकं काय घडलं होतं?
Check it Out