तुम्हाला माहिती आहे का दरवर्षी मानवी हक्क दिन का साजरा केला जातो?

मानवी हक्क दिन हा संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेला आंतरराष्ट्रीय दिवस आहे.

हा दिवस दरवर्षी १० डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

या दिवसाच्या निमित्ताने मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आणि प्रसारासाठी जागरूकता निर्माण केली जाते.

मानवी हक्क हे सर्व माणसांना जन्मतःच मिळालेले हक्क आहेत, जसे की जीवनाचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क, न्यायाचा हक्क, इत्यादी...

वंश, जात, धर्म, लिंग इत्यादींच्या आधारावर मानवाला वंचित ठेवता येत नाही.

लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हाच या दिवसामागचा उद्देश आहे.

१९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा जाहीरनामा  स्वीकारला होता.

आपल्या देशात २८ सप्टेंबर १९९३ पासून मानवी हक्क कायदा लागू झाला

सरकारने १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केली.

तेव्हापासून १० डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आयोजित केला जातो.