कमी कॅलरी आणि हेल्दी ड्रिंकच्या नादात अनेक लोक फिजी ड्रिंक किंवा डाएट कोकची निवड करतात.
पण डाएट कोक आणि इतर पेये आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात का ?
पार्टी असो किंवा मित्रांसोबत मजा करायची असो, तरुणाईसह आजकाल अनेक लोक डाएट कोक- कमी कॅलरी असलेली इतर पेयं पिण्यास प्राधान्य देतात.
बहुतेक लोकांना असं वाटतं की डाएट किंवा फिजी ड्रिंक्स हा एक हेल्दी पर्याय असू शकतो.
अनेक डाएट ड्रिंक्समध्ये इतर स्वीटनर्सचा वापर केला जातो.
त्यामध्ये साखरेपेक्षा कमी कॅलरीज असतात,पण हेही आरोग्यासाठी धोकादायक असू शकते.
अनेक अभ्यासातून हे समोर आले आहे की, ही कमी कॅलरीज असलेली पेय वजन वाढण्यास आणि मधुमेहासाठी कारणीभूत ठरू शकतात.
या पेयांचा आरोग्यावर पुढील प्रमाणे परिणाम होतो
बहुतांश फिजी ड्रिंक्समध्ये सायट्रिक ॲसिड असते, ज्यामुळे दात कमकुवत होतात व ते किडू शकतात.
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की कृत्रिम गोड पदार्थांमुळे वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो.
दिवसातून केवळ दोन शीतपेय प्यायल्याने टाइप-२ मधुमेहाचा धोका दुप्पटीने वाढतो.
लाखो लोक दररोज याचे सेवन करतात. त्यामुळे जगभरात मधुमेह आणि हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचा मेंदूवरही परिणाम होऊ शकतो.
पण रक्षाबंधनाची सुरुवात नक्की झाली तरी कशी? चला तर मग जाणून घेऊया रक्षाबंधनाशी संबंधित काही लोकप्रिय कथा.
Check Out