हिवाळा सुरु झाला की,त्वचेवर लालसरपणा, पुरळ येणे अशा अनेक समस्या उद्भवतात. पण हे येण्याची काय कारणे आहेत?
वातावरणातील कमी आद्रता, थंड हवा तसेच वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे नैसर्गिक तेल आणि मृत त्वचेच्या पेशी निघून गेल्याने आपल्या त्वचेवरील ओलावा नष्ट होतो आणि पुरळ येतात.
आपल्याला वारंवार येणारा थकवा आणि वाढत्या तणावामुळे आपल्याला पुरळ होण्याची शक्यता असते.
जिवाणू किंवा जंतू यांच्या वाढत्या संसर्गाचा आपल्या त्वचेवर परिणाम होण्याची शक्यता असते.
हिवाळ्यामध्ये उबदार असे कपडे परिधान करावे. जेणेकरुन थंडीपासून आपल्या त्वचेचे संरक्षण होईल.
रसायनयुक्त नसणाऱ्या काही मॉइश्चरायझरचा नियमितपणे वापर करून शरीरावर ओलावा राखून ठेवावा.
या दिवसात गरम पाणी शरीरावरील नैसर्गिक तेल काढून घेते त्यामुळे गरम पाण्याने अंघोळ करू नये.
थंडीत फार तहान लागत नाही. मात्र, त्वचेमधील आर्द्रता कायम ठेवण्यासाठी नियमित पाणी पिणे आवश्यक असते.