30.4 C
New York

INDIA Alliance March : राहुल गांधी – संजय राऊत दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

Published:

काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी पत्रकार परिषद (INDIA Alliance March) घेत निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला आहे. तर निवडणूक आयोगाविरोधात संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यलयापर्यंत इंडिया आघाडीकडून मोर्चा काढण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज इंडिया आघाडीचे तब्बल 300 खासदार एकत्र येत निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढत आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या या मोर्चाला परवानगी नाकराली आहे.

दिल्ली पोलिसांकडून निवडणूक आयोगाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान तैनात केले आहे. तर पोलिसांनी मोठी कारवाई करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई सुरु आहे असं यावेळी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले.

इंडिया आघाडीच्या या मोर्चादरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांचाही सहभाग असून निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img