पुण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने (Congress) दोन-दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित केली आहे. 11 आणि 12 ऑगस्ट या दोन दिवसांची ही कार्यशाळा निवासी कार्यशाळा पुण्याच्या (Pune) खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे आयोजित केली आहे. ही कार्यशाळा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक दृष्ट्या सज्ज करण्याच्या उद्देशाने घेतली आहे. 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता, निमंत्रित पदाधिकारी कार्यशाळेखातीर आलेल्या नोंदणीसाठी उपस्थित झाले.
आज सकाळी सामुदायिक प्रार्थनेने शिबिराची सुरूवात झाली. त्यानंतर प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेत काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते सतेज उर्फ़ बंटी पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य अन् ज्येष्ठ नेता बाळासाहेब थोरात, तसेच अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
Congress हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर घणाघात
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं ओरिएन्टेशन, इंट्रोडक्शन आणि इंटरअॅक्शन ही त्रिसुत्री आजच्या कार्यशाळेमागे आहे. महाराष्ट्रातील जाणतं नेतृत्व मार्गदर्शन करणार आहे. आगामी निवडणुकांची रणनिती ठरणार आहे. कॉंग्रेस पक्ष हा देशातील सगळ्यात जुना पक्ष आहे. निवडणुकीपुर्ती जागं आली अन् नंतर सगळं संपलं, कॉंग्रेस पक्ष या विचारधारेचा नाही, सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी असं देखील म्हटलंय.
गळती हा पक्ष कांगावा आहे. सक्षम अन् समर्थ नेतृत्व कॉंग्रेसकडे आहे. भाजप (BJP) हा कॉंग्रेसचे कार्यकर्ते खाणारी चेटकीन आहे. कोणत्याही निवडणुकीला कॉंग्रेस पक्षातले नेते घेतल्याशिवाय त्यांना सामोरं जाता येत नाही. कॉंग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात, कॉंग्रेसयुक्त भाजप झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्टेजमागे वळून पाहिले तर कॉंग्रेसची जास्त लोकं त्यांना मंत्रिमंडळात दिसून येतील, असं देखील सपकाळ यांनी स्पष्ट केलंय.
Congress नवी रणनिती ठरणार
कार्यशाळेत विविध चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. राजकीय व्यवहार समितीची बैठकदेखील याच कार्यशाळेत संपन्न होणार असल्याची माहिती मिळत आहे. 12 ऑगस्ट, दुपारी 4 वाजता, प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचा समारोप होणार आहे.