राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मात्र विविध वादग्रस्त वक्तव्ये करण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. त्यात आता कोकाटेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ते म्हणजे आता कोकाटेंचा थेट सभागृहात जंगली रमी खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यावर आता कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र त्यांना अजित पवार (Ajit Pawar) समज देणार असल्याचं देखील बोललं जात आहे.
Ajit Pawar काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
हा व्हिडीओ काढला गेला तेव्हा मी रमी गेम खेळत नव्हतो. तर मी कुणाली तरी दाखवत होतो की, मोबाईलवर कशा प्रकारे रमीची जाहिरात येते. कारण मी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होतो तेव्हा मी अत्यंत गांभीर्याने सर्व काही बोलतो. उत्तर देतो. त्यामुळे मी असा गेम खेळत नव्हतो. मी शेजारी बसलेल्या कुणाला तरी अशी जाहिरात येते. ही लोकांसाठी योग्य नाही. याचा वाईट परिणाम होतो. असं सांगत असेल. असं स्पष्टीकरण या व्हिडीओवर कोकाटे यांनी दिलं आहे.
Ajit Pawar नेमकं प्रकरण काय?
नुकतच राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. त्यावेळी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे थेट सभागृहात जंगली रमी खेळत होते. असा व्हिडीओ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यावर आता कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र त्यांना अजित पवार समज देणार असल्याचं देखील बोललं जात आहे. कारण यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी म्हटलं आहे की, या व्हिडीओशी कुणीतरी एआय करून छेडछाड केली आहे. त्यावर स्वत: कोकाटेच बोलतील पण यावर त्यांना अजित पवार देखील समज देतील.
Ajit Pawar काय म्हणाले होते रोहित पवार?
जंगली रमी पे आओ ना महाराज …! सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का? कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा कर्जमाफी द्या. असं म्हणत कोकाटेंना रोहित पवार यांनी खोचक टोला लगावला आहे.