जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट (Mount Everest) सर करण्याची अनेकांची इच्छा असते. खरे तर हिला इच्छा म्हणावे की महत्वाकांक्षा असाही प्रश्न आहेच. तर माऊंट एव्हरेस्ट प्रत्येकालाच सर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हे जमते असे नाही. काही लोक या बर्फातच कायमचे गाडले जातात. ‘ग्रीन बूट’ प्रमाणेच काही लोकांना यशस्वी होऊनही यशाचा आनंद साजरा करण्याची संधी मिळत नाही. एव्हरेस्ट हा आता पूर्वी इतका कौतुकाचा विषय राहिलेला नाही. सुमारे ४००० पेक्षा जास्त गिर्यारोहकांनी कारण आतापर्यंत हे शिखर ७००० पेक्षा जास्त वेळा सर केले आहे. त्यामुळे काही नवी महत्वाकांक्षा आहे किंवा नवे आव्हान एव्हरेस्ट सर करणे ही आहे असे अजिबात नाही.
आता बऱ्यापैकी मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेला हा प्रदेशही प्रदूषित झाला आहे. लोकांनी टाकून दिलेला कचरा, अनावश्यक वस्तू तर आहेतच, पण सुमारे २०० हून अधिक मानवी मृतदेह सुद्धा या पर्वतावर तसेच पडून आहेत. इतक्या प्रमाणात तिथे मृतदेह पडून आहेत तर ते तिथून हटवण्याचे प्रयत्न का केला जात नाही? कारण मृतदेहांना असे बेवारस टाकून कुणीही त्यांचा अपमान करू शकत नाही. हे खरे असले तरी एव्हरेस्टवर ज्यांना मृत्यू येतो त्यांच्या बाबतीत मात्र हे एक दुर्दैवी आणि क्रूर सत्य आहे. यामागची कारणे नेमकी काय आहेत ते जाणून घेऊया
सध्यातरी एव्हरेस्टवर असे किती मृतदेह पडून आहेत यांचा नेमका आणि अचूक आकडा कुणाला सांगता येणार नसला तरी किमान २०० हून तरी अधिक मृतदेह तिथे असावेत असा अंदाज आहे. गिर्यारोहक आणि त्यांना मार्ग दाखवणारे शेरपा असेच बर्फाखाली, हिमनद्यामध्ये किंवा हिमवृष्टीमध्ये बुजून गेले आहेत. कधी कधी बर्फ थोडासा त्यांच्या मृत शरीरावरील इकडे तिकडे सरकतो आणि त्यांचा एखादा अवयव तेवढा दृष्टीस पडतो. अनेक जण तर अगदी गाढ विश्रांती घेत असल्यासारखे दिसतात. वाटेवरील मैलाचे दगडच अनेकांचे मृतदेह बनले आहेत. जणू ते सांगताहेत तुमचे यश आता इथून फक्त काही अंतर दूर आहे.
माउंट एव्हरेस्टवर डेथ झोन देखिल आहे माउंट एव्हरेस्टचा डेथ झोन म्हणजे ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीचा भाग. या उंचीवर, हवेतील ऑक्सिजनची पातळी मानवी शरीरासाठी आवश्यक असलेल्या पातळीपेक्षा खूपच कमी असते. त्यामुळे, या भागात जास्त वेळ राहिल्यास मानवी शरीर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे काम करणे थांबवते आणि मृत्यू होतो. डेथ झोनमधून मृतदेह काढणे खूप धोकादायक आणि खर्चिक प्रक्रिया आहे. यासाठी विशेष तयारी आणि प्रशिक्षित लोकांची गरज असते. मृतदेह काढताना, बचाव पथकालाही धोका असतो, कारण त्यांनाही ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. डेथ झोनमध्ये हवामान अत्यंत धोकादायक आणि बदलणारे असते, ज्यामुळे मृतदेह काढणे अधिक कठीण होते. जसजसे तापमान वाढते आणि बर्फ वितळतो, तसतसे हरवलेल्या गिर्यारोहकांचे मृतदेह उघडकीस येतात.