19.7 C
New York

Uddhav Thackeray : विधानसभेतील पराभवावर अखेर उद्धव ठाकरे बोलले, थेट मविआवर फोडलं खापर!

Published:

सात-आठ महिने विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होऊन झाले आहेत. या निवडणूक निकालांवर त्यानंतर चर्चा सुरु असते. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) आता विधानसभेतील पराभवावर मत व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मतभेदांवर निवडणुकीतील पराभवाचे खापर ‘सामना’ दैनिकात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फोडले आहे. ही मुलाखत शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.

Uddhav Thackeray मतदार कसे वाढले?

संजय राऊत यांनी लोकसभेत विजय आणि विधानसभेत पराभव झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, ईव्हीएमच्या घोटाळ्याची चर्चा सुरू आहे. मतदार याद्यांवर त्याच्याबद्दलही चर्चा आहे. बोगस मतदार, मतदार कसे वाढले हे लोकांसमोर आले आहे.

आघाडीतील मतभेदांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मतदारसंघ छोटा होतो तसतशी स्पर्धा वाढते. आघाडीत दोन तीन पक्ष एकत्र आल्यावर खेचाखेची सुरू होते. युतीतही होत होती. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली. त्यावेळीही शिवसेनेने जिंकलेले मतदारसंघ सोडले. विधानसभेत शेवटपर्यंत खेचाखेची सुरू होती. त्याचा दुष्परिणाम असा झाला की, जनतेला वाटले यांच्यात आताच खेचाखेची आहे तर नंतर काय.

Uddhav Thackeray सर्वात मोठी चूक

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील फरक सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेत माझ्याकडे उमेदवार होते, जागा होती, पण निशाणी नव्हती. विधानसभेत निशाणी होती, पण जागा नव्हत्या. जागा कोणत्या हा प्रश्न होता. जागा मिळाल्या तर उमेदवारी कुणाला देणार हे निश्चित नव्हते. तू तू मै मै झाली, ती स्वीकारली पाहिजे. आपल्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक होती. ही चूक परत करायची असेल तर एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही.

लोकसभेचे यश समन्वयाचा अभाव म्हणण्यापेक्षा सर्वांच्या डोक्यात गेले, असे सांगत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आपल्याला लोकसभेत महाविकास आघाडीत नेत्यापासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांमध्ये जिंकायचे आहे, आपलेपणा हा होता.शेतकऱ्यांची कर्ज मुक्तीची घोषणा, असे ठाकरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img