25.2 C
New York

Mazi Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे उत्पन्न कळणार; केंद्र सरकारकडून आयकर डेटा मिळणार, लाभ होणार बंद

Published:

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजनेत (Mazi Ladki Bahin ) अनेक अडचणी येत आहेत. कधी फसवणूक तर कधी कागदपत्रांत फेरफार असे प्रकार समोर आले आहेत. एक मोठी यानंतर आता आणखी बातमी समोर आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करुन देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता महिला बालविकास विभाग इनकम टॅक्स रिटर्न डेटाचा वापर करुन प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांची यादी तयार करणार आहे. यानंतर या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल.

राज्य सरकारने योजना सुरू केली तेव्हा यासाठी काही निकष निश्चित केले होते. अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे अशी अट होती. मात्र ज्यांचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशाही महिलांनी अर्ज केले होते. सुरुवातीच्या काळात सरसकट अर्ज मंजूर करण्यात आले होते. निकषांची बारकाईने तपासणी झाली नव्हती. त्यामुळे या महिलांनाही लाभ मिळत होता.

परंतु, आता राज्य सरकारने लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे. पडताळणी बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. हजारो लाभार्थ्यांना वगळण्यात आलं आहे. दुबार योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी, चारचाकी वाहन असणाऱ्या लाभार्थी यांची नावे बाद केली आहेत. आता ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी सुरू झाली आहे. यात आयकर भरणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. यासाठी राज्य सरकारने प्रत्यक्ष कर मंडळाला विनंती केली होती. त्यानुसार मंडळाने प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे.

ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळली जातील अशी शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मात्र उपलब्ध झालेली नाही. काही लाभार्थ्यांना माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलं आहे. 2 लाख 30 हजार, 65 वर्षांवरील 1 लाख 10 हजार, चारचाकी वाहन असलेल्या 1 लाख 60 हजार, नमो शेतकरी योजनेतील 7 लाख 70 हजार, सरकारी कर्मचारी असलेल्या 2 हजार 652 महिलांना यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील योजनेतून वगळण्यात आलं आहे. योजनेतील निकषांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास आणखीही लाभार्थी बाहेर पडतील.

योजनेसाठी पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या महिलांना वगळण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. सरकारी नोकरी, सरकारी महामंडळे, निमसरकारी नोकरीत असतानाही लाडकी बहीण योजनेत लाभार्थी असतील अशा महिलांना वगळण्यात येणार आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर अशा महिलांनाही बाद करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img