महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा (Thackeray Brothers Alliance) रंगल्या आहेत. मुंबईतील (Mumbai) गिरगाव येथे बॅनर लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परप्रांतीयांचे महाराष्ट्र गिळायाचे मनसुबे पूर्ण व्हायच्या अगोदर एकत्र या आणि मराठी माणसाला वाचवा. आठ करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याची (Maharashtra Politics) आतुरतेने वाट पाहत आहे – आम्ही गिरगांवकर.
Thackeray Brothers Alliance ठाकरे बंधू एकत्र
त्यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटो दैनिक समानाच्या पाहिल्या पानावर छापला आहे. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार, असं हेड लाईन दिली आहे. खूप दिवसानंतर सामनाच्या पाहिल्या पानावर ठाकरे बंधू यांचा एकत्र फोटो झळकला आहे. तर कालच उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, लवकरच बातमी देतो, त्यामुळे सगळ्यांच्या भुवया आणखीनच उंचावल्या आहेत.
Thackeray Brothers Alliance कॉंग्रेसची कोंडी होणार?
ठाकरे बंधू एकत्र आल्यास कॉंग्रेसची कोंडी होणार, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. नोव्हेंबर महिन्यात बिहार विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणूक देखील याच काळात होणार असल्याचं समजतंय. त्यामुळे उत्तर भारतीयांविषयी मनसेच्या मनात जी भूमिका आहे, त्यामुळे थेट कॉंग्रेसला फटका बसू शकतो. तर उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत जावू नये, अशी दबक्या आवाजात कॉंग्रेसच्या नेत्यांची चर्चा सुरू असून खासगी बैठका देखील होत असल्याची माहिती मिळतेय.
Thackeray Brothers Alliance काँग्रेसकडून स्वबळाची तयारी?
ठाकरे बंधुंच्या युतीचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होणार, हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरे सोबत असल्यास मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसला चांगलं यश मिळण्याची अपेक्षा होती. परंतु ठाकरे आता मनसेसोबात जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार का? अशी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे कॉंग्रेस स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी करत असल्याचे संकेत देखील मिळत आहे.