आरसीबीचे (RCB) मार्केटिंग हेड निखिल सोसाळे (Nikhil Sosale) यांना बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत अटक केली आहे. पोलिसांनी निखिल सोसाळे यांना बेंगळुरू विमानतळावरून (Bengaluru Airport) अटक केली आहे. ते मुंबईला जाण्याची तयारी करत होते मात्र त्यापूर्वीच बेंगळुरु पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
बेंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणात 05 जून रोजी बेंगळूरु पोलिसांनी आरसीबी (RCB) मार्केटींग हेड निखिल सोसाळे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली होती.
तर दुसरीकडे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. काल रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत पोलिस आयुक्तांसह 8 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तर आता आरसीबी मार्केटींग हेड निखिल सोसाळे यांना अटक करण्यात आली आहे.
आरसीबीचे मार्केटिंग हेड मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यापूर्वी त्यांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि कोषाध्यक्ष फरार झाले आहे. पोलिसांनी विजय परेडचे आयोजक डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तीन कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे.
मात्र पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्या नावाचा खुलासा केलेला नाही. गुरुवारी 5 जून रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांनी बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद, क्यूबन पार्क पोलिस स्टेशनचे अतिरिक्त सीपी, एसीपी, डीसीपी सेंट्रल डिव्हिजन, क्रिकेट स्टेडियमचे प्रभारी, स्टेशन हाऊस मास्टर आणि स्टेशन हाऊस ऑफिसर यांचा समावेश केला.
18 वर्षात पहिल्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर आरसीबीकडून विजय मिरवणूक काढण्यात येणार होती मात्र त्यापूर्वीच चेन्नास्वामी स्टेडियमवर अचानक चेंगाचेंगरीची घटना घडल्याने 11 जणांना जीव गमावा लागला आहे तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.