19.7 C
New York

RBI : आरबीआयची मोठी घोषणा, रेपो दरात 0.50 टक्के कपात

Published:

सर्वसामान्यांना दिलासा देत देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने (RBI) मोठी घोषणा केली आहे. आरबीआयने आज बँकेच्या एमपीसीने रेपो दरात 0.50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे आता तो 5.5 टक्के झाला आहे. आरबीआयने सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. ज्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांचे व्याजदर कमी होण्याची अपेक्षा आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि सामान्य जनतेला महागाईच्या ओझ्यातून मुक्तता देण्यासाठी आरबीआयने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आरबीआयने फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये एमपीसी बैठका घेतल्या होत्या. दोन्ही वेळा रेपो दरात 0.25-0.25 टक्के कपात करण्यात आली होती.

RBI रेपो दर म्हणजे काय?

रेपो दर म्हणजे ज्या दराने आरबीआय बँकांना अल्पकालीन कर्ज देते आणि त्यात कपात केल्याने बँकांनी ग्राहकांना दिलेल्या कर्जाच्या व्याजदरांवर थेट परिणाम होतो. रेपो रेट हा दर म्हणजे ज्या दरावर आरबीआय बँकांना कर्ज देते, तर रिव्हर्स रेपो दर हा दर आहे ज्यावर आरबीआय पैसे ठेवण्यासाठी बँकांना व्याज देते. रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचा ईएमआय कमी होतो, तर रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारची कर्जे महाग होतात आणि या क्रमाने ईएमआयमध्येही वाढ होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img