25.2 C
New York

 PhonePe : फोन पे युजर्ससाठी गुड न्युज! ‘या’ लोकांना करता येणार विना इंटरनेट पेमेंट

Published:

युपीआय वापरकर्त्यांचे फोन पे (PhonePe) हे आवडते अॅप आहे. फोन पेने एक गुड न्युज याच फोन पे युजर्ससाठी आणली आहे. त्यामुळे आता फोन पेच्या ग्राहकांना विना इंटरनेट पेमेंट करता येणार आहे. जीएस पे ही प्रणाली यासाठी वापरण्यात येणार आहे. मात्र ही सुविधा काही ठराविक प्रकारात मोडणाऱ्या ग्राहकांसाठी देण्यात येणार असल्याचं देखील कंपनीने सांगितलं आहे.

 PhonePe ‘या’ लोकांना करता येणार विना इंटरनेट करता येणार पेमेंट

कंपनीने या नव्या फिचरला त्या लोकांना जोडण्याचं ठरवलं आहे. जे आद्याप देखील फिचर फोन वापरत आहेत. पण फोन पेचा वापर करत नाहीत.यासाठी कंपनी जीएसपे टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांत फिचर फोन्ससाठी एक युपीआय पेमेंट अॅप आणलं जाणार आहे. जीएसपेबद्दल सांगायचं झालं तर हे एक मोबाईल अॅप आहे. जे एनपीसीआयच्या युपीआय पेमेंट सिस्टिमशी जोडलेले आहे.

याच्या मदतीने फिचर फोनवरून युपाीआय पेमेंच केलं जाणार आहे.अनेक कंपन्यांनी असे फिचर फोन आणलेले आहेत. जे या प्रणाली ला सपोर्ट करतात. कारण फोन पे चा विचार आहे की, देशातील अनेक लोक फिचर फोन वापरतात. तसेच ते युपीआय वरून व्यवहार करत नाहीत. त्यांना सहज युपीआय पेमेंट करता यावे. तसेच ऑफलाईन पद्धतीने पेमेंट करता यावे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img