25.2 C
New York

Maharashtra Rain Update : काम असेल तरच घराबाहेर पडा! विजांसह वादळी पाऊस, 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Published:

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. पावसाचा जोर मे महिन्याच्या सुरूवातीला जास्त होता, जून महिन्याच्या सुरूवातीपर्यंत परंतु तो ओसरला (Maharashtra Rain Update) होता. मधल्या पावसाने थोडी सुट्टी तीन ते पाच दिवसांत घेतली होती. परंतु पुन्हा आता ढगाळ हवामानासह, हलक्या मध्यम सरींनी तो हजेरी लावत आहे. काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी अशी परिस्थिती वाढत (Maharashtra Weather Update) आहे. उकाडा अन् उन्हाचा चटका सुद्धा वाढलेला आहे.

Maharashtra Rain Update विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने आज 19 जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. मे महिन्यामध्ये कोसळलेल्या पावसाने आतापर्यंतच्या उच्चांकी पर्जन्यमानाची नोंद झाल्याचं समोर आलंय. परंतु, मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाले, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याचे स्थिती आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावत आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, लातूर, बुलडाणा, या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Maharashtra Rain Update मेघगर्जनेसह आणि वाऱ्यासह पाऊस

मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीनुसार अनेक भागात आहे. हवामानातील या बदलाचे कारण उत्तर गुजरात आणि उत्तर बांगलादेशवरील चक्राकार परिस्थिती आहे, ज्यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण होत आहे.अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागराकडे मान्सूनचा प्रवाह लवकरच पुन्हा वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे राज्यात पाऊस सुरूच राहील. नैऋत्य आणि पश्चिमेकडून येणारे वारे अधिक आर्द्रता आणत आहेत, त्यामुळे अनेक भागात पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे.

ठाण्यातील भिवंडी येथे जोरदार वाऱ्यासह पावसामुळे तापमानात घट झाली. रिमझिम पावसामुळे हवामानात थंडावा आला आणि आर्द्रतेमुळे त्रस्त असलेल्या लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी हवामान अनुकूल झाले आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. जोरदार वाऱ्यांसह पावसामुळे ठाण्यात हवामान आल्हाददायक झाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img