19.7 C
New York

Manoj Jarange : वैष्णवी हगवणे, लाडक्या बहिणी…मनोज जरांगेंची तुफान बॅटिंग

Published:

वैष्णवी हगवणे आणि लाडकी बहीण योजनेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठं भाष्य (Ladki Bahin Yojana) केलं आहे. याप्रकरणी बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलंय की, श्रीमंत लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे हुंड्याचे परिवर्तन व्यवसायात केले पाहिजे. दोन्हीकडचा होणारा खर्च व्यवसायाला द्यायचे. मुली आणि मुलाचे वडील लग्नात (Vaishnavi Hagawane) जे पैसे खर्च करतात, ते एकत्र करून मुलाला व्यवसायाला दिले पाहीजेत, वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आणखी एक अशीच बातमी आली. हे थांबवायचं असेल, तर तरुण लोकांनी शहाणं व्हायला हवं, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

लाडकी बहीण योजनेवर बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलंय की, लाडकी बहीण लाडकी बहीण दीड दीड हजार रुपये, असं म्हणत नादी लावलं. आता महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आल्या आहेत. तोपर्यंत प्रत्येक मंत्र्याच्या तोंडातून एकच शब्द निघतो की, लाडक्या बहिणींना फसवणार नाही. लाडक्या बहिणींना मी हात जोडून सांगतो निवडणुका झाल्यावर हे पैसे देणार नाहीत. छोट्या छोट्या आशा धरू नका. लेकरा बाळांच्या आयुष्याचं नुकसान होतं, हे सगळं खोटं आहे. खोट्या प्रतिष्ठित जगणं गोरगरीब शेतकऱ्यांनी बंद करा, असंही आवाह मनोज जरांगे यांनी केलंय.

मराठा आणि कुणबी एक आहेत. तो कायदा पारित करतात की नाही, ते दिसेल. महाराष्ट्रातील सगळ्या कंप्लेंट मागे घेतो असे म्हटले होते, ते ही घेतात की नाही दिसेल. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करतात की नाही ते दिसेल, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. मी लावून धरलेली बाजू खरी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे जवळपास चार महिने वेळ आहे. त्यांच्याबद्दल काही जणांची जी भावना आहे, ती उघडी पडणे गरजेचे असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांबद्दल किती द्वेष आहे, किती आकसाने ते मराठी गरीब बांधवांबरोबर वागतात. हे आता महाराष्ट्राला दिसेल. त्यांनी जर मराठा कुणबी एकच आहेत, हा जीआर नाही काढला, तर तेवढे पडतील. मराठवाड्यात गॅजेट लागू केलं नाही, तर लोकांच्या नजरेसमोर ती येणार. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबाच्या बलिदानचे पैसे देखील त्यांनी रोखले. त्या लोकांच्या नोकऱ्या देखील रोखल्या आहेत, 29 ऑगस्ट ला मराठ्यांच्या मुलांना मुंबईमध्ये त्रास दिला जातोय का ? हे समाजाला कळेल. मराठा समाजाला रस्त्याने त्रास दिला जातोय का? मराठा समाजाबद्दल द्वेष आकस आहे का ? हे समाजाला कळलं, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

दीड वर्ष वेळ दिला, आता मराठे ऐकणार नाहीत. आता अर्ध्यातून माघारी जा म्हणायला चान्स नाही, त्याची कारण आहेत. मराठा कुणबी एक आहेत. हा अध्यादेश काढायला नाही म्हणू शकत नाहीत. सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावण्यासाठी दीड वर्षे दिले, असं देखील जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठ्यांची मुले देखील डॉक्टर, वकील, पोलीस, शिक्षक, तहसीलदार, कलेक्टर बनायला हवेत, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img