29.6 C
New York

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! अमेरिकेत स्टीलच्या आयातीवर दुप्पट टॅरिफ

Published:

विदेशातून येणाऱ्या स्टीलवर टॅरिफ वाढवण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) घेतला आहे. स्टील आयातीवर या निर्णयानुसार 50 टक्के टॅरिफ आता 25 टक्क्यांऐवजी आकारला जाणार आहे. खनिजे आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यापारावरून अमेरिका आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झालेला असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प यांनी शुक्रवारी या निर्णयाची घोषणा केली. शांघायच्या खराब स्टीलवर अमेरिकेचे भविष्य नाही असे ट्रम्प यावेळी म्हणाले.

हा निर्णय देशांतर्गत स्टील उत्पादनाला चालना देण्यासाठी त्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. चीनवर व्यापारिक दबाव टाकून चीनचे आर्थिक नुकसान करण्याचाही अमेरिकेचा प्लॅन आहे. टॅरिफ वाढवण्याच्या निर्णयामागे यूएस स्टील निप्पॉन डील अधिक बळकट करण्याची योजना आहे. अमेरिकेतील गृहनिर्माण, ऑटोमोटिव आणि निर्माण यांसारखे उद्योग इस्पातवर जास्त अवलंबून आहेत. टॅरिफ वाढल्याने या क्षेत्रांत खर्च वाढू शकतो. यामुळे उत्पादनांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. याचा ग्राहकांवरही परिणाम होईल. टॅरिफमध्ये वाढ केल्याने चीन, कॅनडा, युरोपातून स्टीलच्या आयातीत कमतरता येईल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवी घोषणा केली आहे. यानुसार जपानची निप्पॉन स्टील अमेरिकी कंपनी यूएस स्टीलचे अधिग्रहण करील. परंतु, कंपनी अमेरिकेच्या नियंत्रणात राहील. या व्यवस्थेत एक अमिरेकी टीम आणि एक विशेष वीटो शक्तीची तरतूद आहे. या कराराची आणखी माहिती समोर आलेली नाही. अमेरिकेत मात्र या कराराचा जोरदार प्रचार केला जात आहे.

युनायटेट स्टील वर्कर्स युनियनने ब्लॉकबस्टर डीलवर काही प्रश्न विचारले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की निप्पॉन पूर्ण मालकीशिवाय गुंतवणूक करणार नाही. या कारणामुळे युनियन या कराराच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत आहे. अमेरिकेच्या सरकारकडून मात्र करार चांगला असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये आता आणखी काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img