गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातले होते. (Rain Update) अपेक्षेपेक्षा 16 दिवस आधीच राज्यात मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचाही गोंधळ उडाला. अशामध्ये 26 मे रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर 27 मे रोजी थोड्या फार प्रमाणात उसंत घेतली होती. मात्र, आज (28 मे) मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Mumbai and Maharashtra IMD alert on Rain Update )
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि संपूर्ण कोकण विभागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या भागांमध्ये जोरदार पाऊस, वादळी वारे (50–60 किमी/तास), विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळ होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये 28 मे रोजी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभाग आणि प्रशासनाने केले आहे.
Rain Update देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस
देशात संपूर्ण मान्सून हंगामात (1 जून ते 30 सप्टेंबर) सरासरीपेक्षा 106 टक्के अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. या अंदाजामध्ये 4 टक्के कमी-अधिक फरक पडू शकेल, असेही आयएमडीने स्पष्ट केले आहे. हा अंदाज एप्रिलमध्ये केलेल्या अंदाजापेक्षा जास्त आहे. जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान देशाचा ईशान्य आणि वायव्य भाग वगळता, भारतातील बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. जूनमध्य देशात सरासरी 16.7 सेमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Rain Update 8 जिल्ह्यांना हा अलर्ट
राज्यातील 8 जिल्ह्यांना मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्याचे घाट क्षेत्र, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ठाणे, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 40-50 किमी वेगाने वारे आणि जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.