19.7 C
New York

Rain in Marathwada : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मराठवाड्याकडं सरकलं

Published:

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मराठवाड्याकडं सरकल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Rain in Marathwada) हवामान अनुकूल असल्याने पुढील तीन दिवसांत मान्सून मुंबईसह राज्याचा आणखी काही भाग व्यापण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.

यंदा सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस आधी केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने तब्बल तेरा दिवस आधीच महाराष्ट्रात प्रवेश केला. सर्वसाधारण तारीख ७ जून असते. कर्नाटक किनारपट्टीच्या उत्तर भागातील कारवार येथे शनिवारी पोचलेल्या मान्सूनने रविवारी संपूर्ण गोवा ओलांडत तळ कोकणातील देवगडपर्यंत पोहचला आहे.

मान्सून प्रगतीची उत्तर सीमा रविवारी देवगड, बेळगाव, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई, ऐझॉल, कोहिमा येथून जात असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी मोसमी वाऱ्याचा प्रवाह तीव्र असल्याने पश्चिम किनारपट्टी आणि ईशान्य भारतात मान्सून वेगाने प्रगती करीत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिवस कायम राहणार असून, या काळात महाराष्ट्रासह इतरही राज्यांमध्ये मान्सूनच्या प्रगतीची शक्यता आहे.

शनिवारी रत्नागिरीजवळ किनारपट्टी ओलांडलेल्या ‘डिप्रेशन’ची तीव्रता रविवारी पूर्वेकडे सरकताना कमी झाली. रविवारी ठळक कमी दाबाचे क्षेत्र मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रावर स्थिरावले. या क्षेत्राच्या प्रभावामुळे पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर या जिल्ह्यांसह कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी सर्वदूर संततधार पावसासह मुसळधार सरींनी हजेरी लावली. कोकणात पावसामुळे बागायतदारांचे नुकसान झाले असून, पर्यटनाला फटका बसला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img