29.6 C
New York

Crime News : नवव्या वर्षी अपहरण आणि चक्क १४व्या वर्षी बनली २ मुलांची आई

Published:

अल्पवयीन मुलींचे अपहरण, विक्री आणि त्यानंतर होणाऱ्या अमानुष अत्याचारांचा (Crime News) एक भयानक प्रकार उजेडात आला आहे. एका ९ वर्षांच्या चिमुरडीला या अमानुष व्यापारात केवळ ३ लाख रुपयांत विकले गेले. बालविवाह, जबरदस्तीचे काम आणि अमानुष शोषणानंतर ती दोन मुलांची आईही १४ व्या वर्षी बनली. या सगळ्यावर मात करत ती ९ एप्रिल रोजी तब्बल ७ वर्षांनी घरी परतली. त्यानंतर १९ एप्रिलला याबाबत गुन्हा दाखल झाला. दिव्य मराठीने मुंबईतील अल्पवयीन मुलींच्या तस्करीचे काळे वास्तवही उजेडात आणले आहे. दरम्यान, मुंबई, महाराष्ट्राच्या अनेक अल्पवयीन मुली त्या काळ्याकुट्ट अंधारात असल्याचे ती रडत सांगत होती.

दरम्यान, कल्याण विकासिनी या सामाजिक संस्थेने तिला धीर दिला आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिने सांगितलेली वेदनादायक कहाणी थरकाप उडवणारी आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातून पाच वर्षांत तब्बल १ लाखापेक्षा जास्त महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. देशभरातून बेपत्ता झालेल्या या महिलांचा मानवी तस्करी, अनैतिक धंदे आणि प्रसंगी दहशतवादी कारवायांसाठीही वापर होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. देशात महाराष्ट्राचा मुली आणि महिला बेपत्ता होण्यामागे पाचवा क्रमांक लागतो.

Crime News नथ ८०० रुपयांना विकून गाठले कल्याणमधील घर

दिवस कळले की त्या गावातून एक दिवस कळले सीएसटीला बस जाते. मात्र, माझ्याकडे एकही पैसा नव्हता. त्यानंतर मी ‘नाकातील सोन्याची नथ ८०० रुपयांना विकली. त्यानंतर संधी साधून पळ काढून राजस्थानहून कल्याण गाठले.मी आठ वर्षांनी घरी परतल्यानंतर कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. त्या बंद घरात माझ्यासारख्या अनेक मुली अडकल्या आहेत, असेही सांगताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.

Crime News हजारो मुलींचे अपहरण

मुलीने सांगितलेला प्रकार भयंकर आणि धक्कादायक होता. आम्ही तिच्यासह कुटुंबीयांना धीर दिला आणि पोलिसांत तक्रार केली. मुंबईसारख्या शहरात दरवर्षी शेकडो मुली हरवतात, पण त्यातील फारच थोड्या प्रकरणात ‘अपहरण’ म्हणून गुन्हा दाखल होतो. अनेक फाइल्स ‘पलायन’ म्हणून बंद होतात. बालविक्री, बालविवाह मोडून काढण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत. – अॅड. उदय

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img